ग्राहकांच्या खिशाला झळ, सोन्याच्या भावात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

On: April 28, 2024 9:19 AM
Gold-Silver Rate Today April 28 
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | एप्रिल महिन्यात तापमान जसं वाढतंय तसंच सोन्याचे दरही वाढतच चालले आहेत. या महिन्यात सोन्याने जराही विश्रांती घेतली नाही. याचे भाव रॉकेटच्या तेजीत आहेत. चांदी देखील सुसाट आहे. आज 28 एप्रिल रोजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांदीने काही अंशी दिलासा दिला आहे.

मागच्या आठवड्यात 20 एप्रिल रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली होती. 22 एप्रिल रोजी त्यात पुन्हा 550 रुपयांची घसरण झाली. 23 एप्रिलला 1530 रुपयांची मोठी घसरण झाली. 24 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी वाढले. गुरुवारी सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले. 26 एप्रिल रोजी 400 तर 27 एप्रिलला 200 रुपयांनी किंमती वधारल्या. आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोनं 67,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या भावात लगातार वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

चांदीची माघार

22 एप्रिल रोजी चांदीचे 1 हजारांनी भाव घसरले. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांनी (Gold-Silver Rate Today) भाव उतरले. 23 एप्रिल रोजी 2500 रुपयांची मोठी घसरण झाली.25 एप्रिल रोजी चांदी 400 रुपयांनी घसरली. शुक्रवारी चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली. तर 27 एप्रिल रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 84,000 रुपये आहे.

‘असा’ असेल कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),24 कॅरेट सोनं 72,448 रुपये, 23 कॅरेट 72,158 रुपये, 22 कॅरेट सोनं 66,362 रुपये झाले. 18 कॅरेट 54,336 रुपये, 14 कॅरेट सोनं 42,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today April 28 

महत्त्वाच्या बातम्या-

भन्नाट फीचर्ससह विवो कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घालणार

मध्यरात्री घडलं असं काही की निवडणूक भरारी पथकाची ही झोप उडाली

या दोन राशींसाठी पुढील काही तास महत्वाचे; मिळणार पैसाच पैसा

किरण मानेंकडून 15 लाख रूपयांची ऑफर, फक्त ठेवली ‘ही’ एक अट

“न्यूडिटी दाखवण्यात मला…”, ऐश्वर्या रायच्या विधानाने सगळीकडे एकच चर्चा

Join WhatsApp Group

Join Now