CBSC | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववीच्या वर्गासाठी ‘ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजी’ (OBS) सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या पलीकडे जाऊन अधिक सक्षम बनवण्याची संधी मिळणार आहे. ‘घोकंपट्टी’ला फाटा देत, विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात आणि विचारक्षमतेत वाढ करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे शिक्षणाचा एक नवीन अध्याय सुरू होईल.
मुख्य भर शैक्षणिक सत्रात तीन पेन-पेपर परीक्षांवर राहणार :
ओपन बुक असेसमेंट स्ट्रॅटेजी (OBS) अंतर्गत मुख्य भर शैक्षणिक सत्रात तीन पेन-पेपर परीक्षांवर राहणार आहे, ज्यात विद्यार्थ्यांना पुस्तके आणि इतर साधने वापरण्याची परवानगी असेल. या स्वरूपाचा समावेश असेल, ज्यामध्ये स्टँडर्डाईज्ड मॉडेल पेपर्स आणि मार्गदर्शन तत्त्वांसह संदर्भ साहित्याचा प्रभावी वापर कसा करावा, यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे. त्यांना त्यांच्या ज्ञानात उपलब्ध आणि तात्पुरत्या जोडलेल्या वापरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. (CBSC Exam)
यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील माहितीच नव्हे, तर बाहेरील ज्ञानावरही लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थ्यांना एका पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता विविध स्त्रोतांचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील, ज्यामुळे त्यांची विचारक्षमता अधिक वाढेल.
ओपन बुक असेसमेंटमुळे सोईस्कर :
या बदलामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यांना ओपन बुक असेसमेंटमुळे सोईस्कर वाटेल, तसेच शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना मिळेल आणि घोकंपट्टीची प्रवृत्तीही कमी होईल.
हा निर्णय नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन (NCFSE) च्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या फ्रेमवर्कचा उद्देश पारंपरिक रटाळ पद्धतीऐवजी कौशल्य-आधारित शिक्षणावर भर देणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल आकलन आणि समज विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, जे त्यांच्या भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.






