Accident l पुण्यातील भोर-महाड मार्गावरील वरंध घाटात (Varandh Ghat) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. १०० फूट खोल दरीत इको कार (Eeco Car) कोसळून झालेल्या या अपघातात शुभम शिर्के (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
महाडहून भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमच्या (Shirgaon Rescue Team) सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या (Police) मदतीने जखमींना बाहेर काढले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भोर पोलीस अधिक तपास करत आहेत.
या अपघातात शुभम शिर्के (वय २२) याचा जागीच मृत्यू झाला, तर मंगेश गुजर (वय २६), आशिष गायकवाड (वय २९), सिद्धार्थ गंधणे (वय २६), सौरभ महादे (वय २२), गणेश लवंडे (वय २७), अमोल रेकीनर (वय २७), यशराज चंद्र (वय २२) आणि आकाश आडकर (वय २५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
Accident l नेमके काय घडले? :
पुण्यातील भोर-महाड मार्गावर सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भोर-महाड मार्गावरील वरंध घाटातून इको कार महाडहून भोरच्या दिशेने जात होती.
घाटातील उंबर्डे गावच्या हद्दीत पहाटे चार वाजताच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून इतर ८ जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी बचावकार्य केले आणि अपघाताची माहिती घेत तपास सुरू केला आहे.






