आनंदाची बातमी! ‘या’ सरकारी बँकेने होम लोन केलं स्वस्त

On: November 13, 2025 4:55 PM
Home Loan
---Advertisement---

Canara Bank | कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील सरकारी मालकीच्या कॅनरा बँकेने (Canara Bank) आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये कपात केली आहे. या निर्णयामुळे बँकेकडून घेतलेल्या गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या EMI आता कमी होणार आहेत.

कॅनरा बँकेचा नवीन MCLR दर 12 नोव्हेंबर 2025 पासून लागू झाला असून, 5 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.05 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. यामुळे कर्जदारांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

कॅनरा बँकेचे नवीन MCLR दर :

कॅनरा बँकेने सर्व कालावधींसाठी MCLR दर खालीलप्रमाणे निश्चित केले आहेत:

एका रात्रीसाठी: 7.90%

1 महिन्यासाठी: 7.95%

3 महिन्यांसाठी: 8.15%

6 महिन्यांसाठी: 8.50%

1 वर्षासाठी: 8.70%

2 वर्षांसाठी: 8.85%

3 वर्षांसाठी: 8.90%

ही घट विशेषतः फ्लोटिंग रेटवर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्या मासिक हप्त्यात थेट घट होणार आहे. घरकर्ज, कार लोन किंवा बिझनेस लोन घेतलेल्या ग्राहकांना EMI मधील ही घट थेट अनुभवता येईल.

Canara Bank | MCLR म्हणजे काय आणि त्याचा फायदा कसा होतो? :

MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate) हा दर म्हणजे बँकांकडून ठरवला जाणारा बेंचमार्क व्याजदर होय. बँका याच दराच्या आधारे कर्जाचे व्याज निश्चित करतात. MCLR वाढला की व्याजदर वाढतो आणि घटला की कर्जाचे व्याजदर कमी होतात. त्यामुळे, MCLR कमी झाल्यास ग्राहकांचा EMI कमी होतो.
कॅनरा बँकेचा हा निर्णय दीर्घकालीन कर्जधारकांसाठीही लाभदायक आहे. घरकर्ज किंवा व्यवसायिक कर्जावर दीर्घकाळात या 0.05 टक्क्यांच्या घटीमुळे हजारो ते लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

जर एखाद्या ग्राहकाचे कर्ज MCLR आधारित असेल आणि तो EBLR (External Benchmark Lending Rate) आधारित कर्जात रूपांतर करू इच्छित असेल, तर बँक ही सुविधा देखील देते. मात्र यासाठी ग्राहकाला एकदाच रूपांतरण शुल्क भरावे लागते.

News Title: Canara Bank Cuts MCLR: Home Loan, Car Loan, and Personal Loan EMIs to Become Cheaper from November 12

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now