‘गुड मॉर्निंग आई…’ अपघातापूर्वी दीपक पाठकचा घरी शेवटचा हृदयद्रावक फोन

On: June 13, 2025 11:23 AM
Deepak Pathak last call
---Advertisement---

Deepak Pathak last call | अहमदाबाद विमान दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले, पण त्यामागे राहिल्या असंख्य अस्वस्थ करणाऱ्या आणि अश्रूंनी भिजलेल्या कहाण्या. त्यापैकी एक हृदयद्रावक कथा म्हणजे बदलापूरच्या दीपक पाठक याची. ११ वर्षांपासून एअर इंडियात केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेला दीपक अपघातग्रस्त विमानात ड्युटीवर होता. मात्र त्याचा त्या दिवशीचा “गुड मॉर्निंग आई…” म्हणत केलेला फोन, कुटुंबासाठी शेवटचा संवाद ठरला. (Ahmedabad plane crash)

शेवटच्या क्षणांपर्यंत आईशी संवाद :

१२ जूनच्या सकाळी दीपकने आईला फोन करून, नेहमीप्रमाणे “गुड मॉर्निंग आई” म्हणत गप्पा मारल्या. कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जास्त संवाद न होताही, आईशी त्याचा तो नियमित संवाद होता. पण कोणालाही कल्पना नव्हती की तो त्याचा शेवटचा फोन ठरणार आहे.

अपघाताच्या बातमीनंतर कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. फोन वाजत होता पण कोणी उचलत नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांनी आशा सोडली नव्हती. “जोपर्यंत फोन वाजतोय, तोपर्यंत आम्ही मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणार नाही,” असं घरच्यांनी भावुक होऊन सांगितलं. (Ahmedabad plane crash)

Deepak Pathak last call | दीपकच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर :

दीपकच्या कुटुंबात पाच भावंडं आहेत आणि चार वर्षांपूर्वी त्याचं लग्नही झालं होतं. अपघाताची बातमी मिळाल्यानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मित्र-परिवार, शेजारी आणि नातेवाईक तातडीने त्याच्या घरी पोहोचले. घरात आक्रोश आणि धक्का जाणवत होता.

एअर इंडियात ११ वर्षांची सेवा देणाऱ्या दीपकची कामगिरी उत्कृष्ट होती. तो मनमिळावू आणि जबाबदारीने काम करणारा कर्मचारी म्हणून ओळखला जात होता. घरच्यांसाठी तो आधार होता. त्याच्या सहकाऱ्यांनाही या घटनेचा धक्का बसला आहे.

265 जणांचा बळी, एक अपघात आणि अनेक कुटुंबांवर काळोख :

AI-171 ही फ्लाईट टेकऑफनंतर अवघ्या काही क्षणात अहमदाबादच्या मेघानी भागातील मेडिकल कॉलेज वसतीगृहावर कोसळली. 265 जणांचा मृत्यू झाला. फक्त एक प्रवासी आणि एकजण फ्लाइट मिस केल्यामुळे बचावले. बाकी सर्वांचा मृत्यू झाला.

“गुड मॉर्निंग आई…” हा संवाद आता त्या आईच्या कानात आयुष्यभर घुमत राहील. दीपक पाठकसारख्या हजारो तरुणांचे स्वप्नं, जिद्द आणि कर्तृत्व एका क्षणात आगीच्या ज्वाळेत विरून गेले. पण त्यांची आठवण काळजावर कोरली गेली आहे.

News Title: “Good Morning, Mom…”: Cabin Crew Deepak Pathak’s Last Call Before Ahmedabad Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now