BSNL ने उडवली Jio-Airtel ची झोप; ग्राहकांना मिळणार मजबूत सिग्नल

On: January 25, 2025 4:42 PM
BSNL Activates Over 65,000 4G Towers, Promises Better Connectivity
---Advertisement---

4G Towers | सरकारी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) भारत संचार निगम (बीएसएनएल) च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. वेगवान इंटरनेट (Internet) आणि भारताच्या कानाकोपऱ्यात मोबाईल नेटवर्क (Mobile Network) पोहोचवण्यासाठी कंपनीचे अथक प्रयत्न सुरू आहेत. (4G Towers)

या प्रयत्नांना यश आले असून कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंट एक्स (X) वर एक पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. बीएसएनएलने १ लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या आपल्या लक्ष्याकडे एक मोठे पाऊल उचलले आहे.

सरकारी ॲप्स (Apps) एकाच ठिकाणी उपलब्ध होणार; Apple (ॲपल) आणि Google (गुगल) कडे मदतीचा हात!

देशभरात ६५,००० हून अधिक 4G मोबाईल टॉवर्स लाईव्ह करून बीएसएनएलने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. या वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या 4G सेवांच्या व्यावसायिक लाँचच्या (Commercial Launch) दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

१ लाख 4G टॉवर्स बसवण्याच्या उद्दिष्टासह, बीएसएनएल आपली जुनी 3G पायाभूत सुविधा बंद करून, उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी (Network Connectivity) आणि चांगला वापरकर्ता अनुभव (User Experience) देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे. (4G Towers)

3G सेवा बंद; ग्राहकांना 4G नेटवर्कमध्ये अपग्रेड (Upgrade) करण्याचे आवाहन

काही दिवसांपूर्वीच कंपनीने घोषणा केली होती की, आता बीएसएनएलची 3G पायाभूत सुविधा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे जे ग्राहक 3G सेवेचा वापर करत आहेत, त्यांनी आपले नेटवर्क 4G मध्ये अपग्रेड करणे गरजेचे आहे. 3G पायाभूत सुविधा बंद केल्यानंतर ६५,००० हून अधिक 4G मोबाईल टॉवर्स लाईव्ह करून बीएसएनएलने यशाचा आणखी एक टप्पा गाठला आहे.

ग्राहकांना मिळणार मजबूत सिग्नल (Signal), चांगला रिच (Reach) आणि वेगवान गती (Speed)

बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत X हँडलवर (X Handle) याबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की आता ६५ हजारांहून अधिक टॉवर्स लाईव्ह झाले आहेत. यामुळे ग्राहकांना मजबूत सिग्नल, चांगला रिच आणि वेगवान गतीचा अनुभव मिळेल. 4G सोबतच, बीएसएनएल पुढील पिढीची टेलिकॉम सेवा (Telecom Service) सुरू करण्यासाठी टाटा (Tata) यांच्या सहकार्याने त्यांच्या 5G नेटवर्कची (5G Network) देखील सक्रियपणे चाचणी करत आहे. (4G Towers)

Title : BSNL Activates Over 65,000 4G Towers, Promises Better Connectivity

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now