‘हा’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन, संपत्तीचा आकडा समोर

On: March 27, 2025 4:54 PM
comedian
---Advertisement---

Comedian | सध्याच्या घडीला कपिल शर्मा (Kapil Sharma) हे नाव भारतातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून घेतलं जातं. मात्र संपत्तीच्या बाबतीत कपिल नव्हे, तर तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता ब्रह्मानंदम (Brahmanandam) भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन ठरले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीने रजनीकांत (Rajinikanth), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कपिल शर्मालाही मागे टाकलं आहे.

ब्रह्मानंदमची 500 कोटींची संपत्ती

डीएनए आणि मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ब्रह्मानंदम यांनी आजवर 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या एकूण संपत्तीची किंमत 60 मिलियन डॉलर (भारतीय चलनात 500 कोटी रुपये) एवढी आहे.

तुलनात्मकदृष्ट्या, रणबीर कपूर यांची संपत्ती सुमारे 350 कोटी, प्रभासची 300 कोटी, रजनीकांतची 400 कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे. तर कपिल शर्माची संपत्ती सुमारे 300 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे ब्रह्मानंदम यांची संपत्ती कपिलपेक्षा तब्बल 66 टक्क्यांनी अधिक आहे.

कॉलेज प्राध्यापक ते कॉमेडीचा राजा

ब्रह्मानंदम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून केली होती. 1980 च्या दशकात त्यांनी रंगभूमीवर अभिनयाला सुरुवात केली आणि 1985 मध्ये टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं.

1987 मध्ये ‘अहा ना पेलांता!’ या चित्रपटाद्वारे त्यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 90 च्या दशकात त्यांचा दर दुसऱ्या-तिसऱ्या तेलगू सिनेमात ठरलेला सहभाग असायचा.

गिनीज बुकमधील नोंद

2012 मध्ये ब्रह्मानंदम यांना सर्वाधिक स्क्रीन क्रेडिट्स मिळाल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यांनी 2020 पर्यंत सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचा विक्रम केला असून त्यांनी प्रेम नझीर यांना मागे टाकलं.

Title: Brahmanandam Beats Kapil, Becomes Richest Comedian

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now