शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’! काही मिनिटांत हजारो कोटींचा चुराडा; नेमकं काय घडलं?

On: April 7, 2025 12:22 PM
Share Market
---Advertisement---

Share Market l आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे. सेन्सेक्समध्ये तब्बल 4000 अंकांची घसरण पाहायला मिळाली असून अवघ्या काही मिनिटांत हजारो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. अनेक लहान गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

या घसरणीचा थेट संबंध अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टेरिफ धोरणाशी जोडला जात आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुरुवातीलाच मोठी पडझड; निफ्टी, बँक निफ्टीही कोसळले :

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 3915 अंकांनी घसरून 71,449 वर पोहोचला. निफ्टीमध्ये 1146 अंकांची घसरण होऊन तो 21,758 वर उघडला. बँक निफ्टीमध्ये तब्बल 2166 अंकांची मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांची घबराट वाढली असून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली.

निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्समध्ये तब्बल 3400 अंकांची घसरण झाली असून तो सध्या 47,249 च्या आसपास आहे. विशेष बाब म्हणजे India VIX मध्ये तब्बल 56% वाढ झाली आहे, जी बाजारातील अस्थिरतेचं निदर्शक आहे.

Share Market l टाटाच्या शेअर्सला सर्वाधिक फटका; रुपयाचाही घसरणीचा कल :

आजच्या ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक फटका टाटा समुहाच्या शेअर्सना बसला आहे. टाटा स्टील, ट्रेंट, टाटा मोटर्स यांचे स्टॉक्स सर्वाधिक कोसळले आहेत. याशिवाय निफ्टी 50 मधील जवळपास सर्व स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे.

शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हाच्या तुलनेत रुपयाच्या दरातही घसरण झाली असून रुपया प्रति डॉलर 85.74 या पातळीवर गेला आहे. हे गुंतवणुकीच्या दृष्टीने आणखी चिंतेचं कारण ठरत आहे.

News Title: Black Monday in Share Market (7 April 2025): Sensex Crashes 4000 Points, Small Investors Hit Hard

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now