Jaffer Express Hijack l पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने मोठी कारवाई करत जाफर एक्स्प्रेस रेल्वेचे अपहरण केले आहे. तब्बल 214 प्रवासी ओलीस ठेवले गेले असून, BLA ने पाकिस्तानला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर दर तासाला 5 बंधकांना ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
जाफर एक्स्प्रेसवर हल्ला, 214 प्रवासी ओलीस :
क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्स्प्रेस रेल्वे बलुचिस्तानमधील एका बोगद्यात प्रवेश करत असताना BLA बंडखोरांनी अचानक हल्ला केला आणि ट्रेनचा ताबा घेतला. या वेळी रेल्वेमध्ये 400 हून अधिक प्रवासी होते. सध्या 214 प्रवासी BLA च्या ताब्यात आहेत.
पाकिस्तानी लष्कराने तत्काळ कारवाई करत 104 प्रवाशांची सुटका केली. सुटलेल्या बंधकांमध्ये 58 पुरुष, 31 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, BLA ने हा दावा फेटाळून लावत बंधकांची संख्या अधिक असल्याचे सांगितले आहे.
Jaffer Express Hijack l BLA चा पाकिस्तानला इशारा :
BLA ने पाकिस्तानसमोर मोठ्या मागण्या ठेवल्या असून, बलुच राजकीय कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर प्रत्येक तासाला 5 बंधकांना ठार मारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
याशिवाय, पाकिस्तानने लष्करी कारवाई केल्यास प्रत्येक गोळीच्या बदल्यात 10 पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्याची धमकी BLA ने दिली आहे. पाकिस्तानी लष्कर ही स्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून, परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे.






