“राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकणारे”

On: January 10, 2023 6:18 PM
---Advertisement---

औरंगाबाद | होय मी उपटसुंभा आहे असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी थेट पवार घराण्यावर विखारी टीका केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

अजित पवार मला उपटसुंभा म्हणाले, होय मी उपटसुंभा आहे. मी पवारांना इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून, राजकारणातून पवारांचं घराणं मी उपटून टाकण्याचं काम हाती घेतलं आहे, असं ते म्हणालेत.

पवारांना बोलायला लोक घाबरतात. नीती खुंटली का तुमची. तुम्हाला माहिती आहे मी कुणाला बोलायला घाबरत नाही. ही लोक आमच्यामुळे मोठी झाली आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

ज्या पद्धतीने फुले, शाहु-आंबेडकर यांचं नाव घेऊन बहुजनांवर अन्याय केला, हे पाप करण्यात पवार कुटुंबीय नंबर वनवर आहे. यांनी आपल्याला वर येऊ दिलं. दुष्काळी पट्यात त्यांनी काम केलं नाही. लोकांना पाणी दिलं नाही, अशी टीकाही पडळकर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now