‘आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही’; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा

On: January 10, 2023 4:49 PM
---Advertisement---

मुंबई | विरोधी पक्षेनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकारपरिषदेत बोलताना शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराची केस दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून अजित पवारांनी शिंजे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला नाही आणि तरीही त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करायची म्हणजे ही मोगलाईच लागली. असं दुनियेत कधी घडत नाही. हे जर व्हायला लागलं तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय.

आम्हालापण वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, आम्हीपण त्या आयुधांचा वापर करू. आम्ही पण अशाप्रकारे जर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही, असा इशारा अजित पवारांनी दिलाय.

दरम्यान, नतेबाबत कुठल्याबाबतीत चुकीचं घडलेलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाचा उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now