“बलात्कार करतो का?” म्हणत भाजपचे बाबासाहेब आगे यांची हत्या, आरोपीचा मोठा खुलासा

On: April 16, 2025 6:51 PM
babasaheb age
---Advertisement---

Babasaheb Age | माजलगावमध्ये मंगळवारी दुपारी थरारक घटनेने शहर हादरून गेले. भाजपचे तालुका सरचिटणीस बाबासाहेब आगे (Babasaheb Age) यांच्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करत आरोपीने निर्घृणपणे खून केला. आरोपी नारायण फपाळ (Narayan Fapal) याने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

पाठलाग करत ‘बलात्कार करतो का’ –

माजलगाव बसस्थानकाजवळील भाजप कार्यालयात बाबासाहेब आगे (Babasaheb Age) हे दुपारी अडीच वाजता आपल्या सहकाऱ्यांसोबत बसले होते. त्याच वेळी आरोपी नारायण फपाळ हातात कोयता घेऊन दबा धरून बसला होता. बाबासाहेब आगे कार्यालयातून बाहेर पडताच नारायणने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

आगे (Babasaheb Age) यांनी पळून वाचण्याचा प्रयत्न केला, पण नारायणने त्यांचा पाठलाग करत “बलात्कार करतो का?” अशी घाणेरडी धमकी देत शरीराच्या एका बाजूस सपासप वार केले. या हल्ल्यात बाबासाहेब यांचा जागीच मृत्यू झाला.

हत्यानंतर आरोपीची कबुली-

या भयानक घटनेनंतर नारायण फपाळ स्वत: माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गेला. तिथे उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांसमोर त्याने आपल्याच हाताने खून केल्याची कबुली दिली. मृत बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका सरचिटणीस आणि बीड लोकसभा विस्तारक होते. त्यांच्या हत्येमुळे पक्षात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपीच्या हल्ल्यामागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाही.

आरोपीने हल्ल्याच्या वेळी कोयता आपल्या शर्टच्या मागच्या बाजूस लपवलेला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे यांच्याजवळ पोहोचताच त्याने तो कोयता काढून सपासप वार केले. या थरारक हल्ल्यात बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून, ही हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाली असावी असा प्राथमिक संशय आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे माजलगावसह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

News Title – bjp leader babasaheb age killed in beed

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now