ब्रेकिंग! भाजपच्या ‘टायगर’ नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

On: March 27, 2025 12:24 PM
BJP
---Advertisement---

BJP Leader Murder l देशात राजकीय नेत्यांच्या हत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच झारखंडमध्ये भाजपमधील ‘टायगर’ म्हणून ओळखले जाणारे अनिल महातो (Anil mahota death) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. रांची शहरातील प्रसिद्ध कांके चौकात चहाच्या टपरीवर उभे असताना, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अनिल महातो यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी त्यांच्या डोक्यात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. (Anil mahota News)

राजकारणात धक्का; झारखंडात तणाव :

अनिल महातो हे रांचीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सह-महावीर मंडळाचे अध्यक्ष होते. झारखंडमध्ये त्यांची प्रतिमा आक्रमक आणि लोकप्रिय नेत्याची होती. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, भाजपने गुरुवारी झारखंड बंदची हाक दिली आहे. अनेक ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला, तसेच कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Anil mahota dead)

पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीचा माग काढला. पुंडग येथील रोहित वर्मा या युवकाला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. आरोपीने पोलिस पथकावर गोळी झाडली, त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्याच्या मांडीला गोळी लागली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

BJP Leader Murder l ‘सुबोध जयस्वाल’च्या हत्येचा बदला? :

रांचीचे एसएसपी चंदन सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपी रोहित वर्मा (Rohit varma) याने चौकशीत कबुली दिली की, लोहारदगा येथील कुर्डू बस स्टँडवर सुभाष जयस्वाल यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात अनिल महातो यांचा सहभाग असल्याचा संशय होता. याच संशयातून रोहित वर्मा याने सूड घेत महातो यांची हत्या केली, असा जबाब दिला आहे.

दिवसाढवळ्या अशा हत्यांमुळे झारखंडातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजपने राज्य सरकारवर तीव्र टीका करत दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टमार्फत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू केला आहे. (Anil mahota fire)

News Title: BJP Leader Anil Mahato Shot Dead in Ranchi; Revenge Killing Triggers Jharkhand Shutdown

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now