बिहारमध्ये असं एक गाव, जिथे एकही पुरुष राहत नाही; कारण जाणून थक्क व्हाल!

On: November 14, 2025 11:16 AM
Bihar unique village
---Advertisement---

Bihar unique village | बिहारमधील बांका जिल्ह्यात एक असं अनोखं गाव आहे, जे सध्या राज्यभर नाही तर देशभर चर्चेत आलं आहे. या गावाचं नाव आहे महोलिया (Maholiya). या गावाची सर्वात विचित्र आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे गावात तुम्हाला एकही पुरुष दिसणार नाही! गावभर केवळ महिला आणि लहान मुलेच दिसतात. पहिल्यांदा ऐकल्यावर हे अविश्वसनीय वाटत असलं तरी ही गोष्ट खोटी नाही. (Bihar unique village)

महोलियामध्ये पुरुष नसण्यामागचं कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल. गावातील जवळजवळ सर्व पुरुष वर्षभर कोलकाता येथे स्वयंपाकी म्हणून काम करतात. त्यामुळे हे गाव विनोदाने नाही तर वास्तवात महिलांनीच चालवलेलं गाव आहे. शेतीपासून घरकामापर्यंत, मुलांचे शिक्षणापासून गावाची जबाबदारीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या गावातील महिला सांभाळतात. (Bihar unique village)

कोलकात्यात माहोलियाच्या ‘महाराजांचा’ दबदबा :

महोलियाच्या पुरुषांनी वर्षानुवर्षे करून कोलकात्यात अशी ओळख निर्माण केली आहे की, आज बंगाली समाजातील अनेक कुटुंबांना त्यांच्या मेजवानी आणि समारंभांसाठी महोलियाचे महाराजच हवेत. कोलकात्यात त्यांना प्रेमाने “महाराज” म्हणून संबोधलं जातं.

गावातील सुमारे 45 घरांपैकी 100 हून अधिक पुरुष आज कोलकात्यात कायमस्वरूपी राहत आहेत आणि किचनचे संपूर्ण व्यवस्थापन करतात. त्यांच्या उत्कृष्ट स्वयंपाकामुळे आज कोलकात्यात त्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळेच हे काम हळूहळू गावाची ओळख बनलं आणि आज जवळजवळ प्रत्येक पुरुष कोलकात्यातच आहे. (Bihar unique village)

गावातील पुरुषांमध्ये घनश्याम महाराज, सुखदेव महाराज, माधो महाराज अशी नावे आढळतात. “महाराज” हे नाव आता त्यांच्या कुटुंबाचं आडनाव बनलं आहे.

Bihar unique village | कामातून स्थैर्य, कमाई आणि कोलकात्यातच दुसरं घर :

महोलियाचे महाराज त्यांच्या अनुभवानुसार दरमहा 10 ते 20 हजारांपर्यंत कमाई करतात. राहण्याची आणि खाण्याची सोय कोलकात्यातील कुटुंबेच करतात, त्यामुळे खर्च जवळजवळ शून्य. त्यामुळे अनेकांनी तिथे स्वतःची घरेही खरेदी केली आहेत.

घनश्याम महाराज सांगतात की, हे काम गावाची जुनी परंपरा नव्हती. परंतु रोजगार मिळू लागला, घर चालू लागलं, परिवार सुखी झाला आणि गावातील जवळपास सर्व पुरुषांनी हे काम स्वीकारलं. आज कोलकाता त्यांचं दुसरं घर बनलं आहे.

महोलियात महिला सांभाळतात गावाची सूत्रं :

गावात पुरुष नसल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या महिलांवर आहेत. शेती, मुलांचं शिक्षण, कुटुंबाचं व्यवस्थापन सर्वकाही महिलाच सांभाळतात. पुरुष फक्त सणासुदीच्या किंवा खास प्रसंगीच गावात परततात.
महोलियातील महिलांची कर्तबगारी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. पुरुष दूर असले तरी त्यांनी गाव स्वतःच्या बळावर उभं ठेवलं आहे.

News Title: Bihar Village with No Men: Maholiya’s Unique Story and the Rise of ‘Maharaj’ Cooks in Kolkata

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now