फॅमिली रेस्टॉरंटच्या नावाखाली सुरू होता धक्कादायक प्रकार, मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

On: January 27, 2025 1:35 PM
Nagpur News
---Advertisement---

Sex Racket | बिहारची (Bihar) राजधानी paaटणा (Patna) येथून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणा पोलिसांना (Patna Police) एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये (Family Restaurant) छुप्या पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाची (Prostitution) माहिती अनेक दिवसांपासून मिळत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट एका फॅमिली रेस्टॉरंटच्या नावाखाली चालवले जात होते.

याबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी एका रेस्टॉरंटवर छापा (Raid) टाकला आणि तेथून तीन मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत अटक केली. तसेच, तीन मुलींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोशनी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये चालायचे सेक्स रॅकेट

राजधानी पाटण्यातील एसबीआर चौकात (SBR Chowk) रोशनी नावाचे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. या फॅमिली रेस्टॉरंटच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या तक्रारींवरून पोलिसांनी रोशनी फॅमिली रेस्टॉरंटवर छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या कारवाईत एका कौटुंबिक रेस्टॉरंटमधील छुप्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाला. अचानक छापा टाकल्याने रेस्टॉरंटमध्ये एकच गोंधळ उडाला.

४ मुले, ३ मुली ताब्यात; मालकही अटकेत

वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी धडक कारवाई केली. घटनास्थळावरून चार मुलांना ताब्यात घेण्यात आले, तसेच तीन मुलींची सुटका करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या सर्वांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले आहे. पोलिसांनी एका खोलीतून अनेक आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून रेस्टॉरंटच्या मालकालाही अटक केली आहे. छापा टाकल्यानंतर पोलिसांनी आक्षेपार्ह वस्तूंसह सर्व लोकांना पोलीस ठाण्यात आणले असून, अटक केलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Title: bihar patna sex racket busted in family restaurant 4 boys 3 girls detained

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now