बिहार निवडणुकीत Gen Z उमेदवारांची जोरदार एंट्री; कोण आघाडीवर, कोणाला फटका?

On: November 14, 2025 12:49 PM
Bihar Election Result 2025
---Advertisement---

Bihar election Gen Z | बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये Gen Z उमेदवार हे सर्वात मोठे आकर्षण ठरले आहेत. 25 ते 30 वयोगटातील अनेक तरुणांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरून राज्याच्या राजकारणात नवा ऊर्जावान प्रवाह आणला आहे. प्रमुख पक्षांसह स्वतंत्र उमेदवारांनीही तरुण नेतृत्वावर मोठा विश्वास दाखवला आहे. तरुण मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता, या नव्या चेहऱ्यांमुळे निवडणुकीत वेगळा रंग चढला आहे. (Bihar election Gen Z)

सध्याच्या सुरुवातीच्या मतमोजणी कलांनुसार, काही Gen Z उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे, तर काहींना सुरुवातीलाच फटका बसला आहे. विशेष म्हणजे तरुण उमेदवारांमुळे अनेक मतदारसंघांत कडवा संघर्ष निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. जनतेचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.

भाजप–जेडीयूचे Gen Z उमेदवार प्रभावी; योद्ध्यांना लक्षणीय पाठिंबा :

भाजपने या निवडणुकीत Gen Z ला विशेष संधी दिली आहे. दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघातून स्पर्धेत असलेल्या 25 वर्षीय गायिका मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत. त्यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी उसळली होती आणि आजच्या कलांनी त्या लोकप्रियतेचे प्रतिबिंब दाखवले आहे. तसेच भाजपा उमेदवार राकेश रंजन शाहपूरमधून चांगली लढत देत आहेत.

जेडीयूनेही तरुणांवर मोठा विश्वास दाखवला आहे. रवीना कुशवाह (27), विभूतीनगर येथे काट्याची लढत देत आहेत, तर आदित्य कुमार (30) हे सकरा मतदारसंघात जोरदार प्रतिस्पर्ध्यांना सामोरे जात आहेत. कोमल कुशवाहा (30) गायघाटमधून चांगली छाप पाडत असल्याची माहिती समोर येत आहे.

RJD, LJP, CPI-MLसह इतर पक्षांचे तरुणही रिंगणात; कुणाची पकड मजबूत? :

लोजपा (रामविलास) ने फतुहा मतदारसंघातून 29 वर्षीय रूपा कुमारी यांना मैदानात उतरवले आहे. त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाठिंबा मिळत असल्याचे अहवाल सांगतात. CPI–ML ने गोपाळगंजच्या भोरे मतदारसंघात 29 वर्षीय धनंजय कुमार यांच्यावर विश्वास ठेवला असून ते आव्हानात्मक स्थितीत आहेत. (Bihar election Gen Z)

राजदनेही Gen Z उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार उपस्थिती दाखवली आहे. तनुश्री कुमारी (26), बाराचट्टी येथून आघाडीचे संकेत देत आहेत. त्याचप्रमाणे, माजी नेते मुन्ना शुक्लांची मुलगी शिवानी शुक्ला (28) लालगंजमध्ये कट्टर संघर्षात आहेत. दीपू सिंग (28), संदेश आणि रविरंजन (29), अस्थान हे उमेदवारही तरुण मतदारांच्या पसंतीस उतरले आहेत.

काँग्रेस पक्षाकडून 25 वर्षीय नवीन कुमार यांना संधी देण्यात आली असून त्यांनी युवा नेतृत्वाला बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते काँग्रेसच्या सर्वात तरुण चेहऱ्यांपैकी एक म्हणून विशेषत्वाने चर्चेत आहेत.

News Title: Bihar Election 2025: Which Gen Z Candidates Are Leading and Who Is Falling Behind? Full Results Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now