मुंबई| सध्या महाराष्ट्रचं लक्ष शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीकडं लागलं आहे. शिंदेंच्या बंडानंतर जनता या निवडणुकीत कोणाच्या बाजूनं कौल देईल हे पाहणं महत्वाचं ठरणारआहे.
त्यातच आता कोकण शिक्षक मतदार संघात भाजपला मोठे यश मिळाल्याचे समोर आलं आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केले आहे.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना म्हात्रे म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजूटीमुळं विजय झाला आहे. त्यामुळं सर्वांचे आभारही म्हात्रे यांनी यावेळी मानले.
तर पराभूत झालेल्या बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की, कोकणच्या शिक्षकांनी कौल मोकळ्या मनानं दिला आहे. तसेच शिक्षकांनी दिलेला निकाल आपल्याला मान्य आहे, असंही पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-






