सोनाली कुलकर्णीनं दिली गुडन्यूज?

On: February 2, 2023 12:36 PM
---Advertisement---

मुंबई| मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीकडं(Sonalee Kulkarni) पाहिलं जातं. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं तिनं सर्वांची मन जिंकली आहेत.

तिनं मितवा(Mitwaa), पांडू(Pandu) यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे आणि या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडते.

सोनलीनं नुकतंच ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टाॅकशोमध्ये बोलताना सर्वांना बुचकळ्यात पाडलं आहे. या शोच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, तिला गुडन्यूजबाबत विचारण्यात येतं. त्यावेळी ती लाजताना दिसत आहे. त्यामुळं ती प्रेग्नंट आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

परंतु सोनाली खरंच प्रेग्नंट आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. कारण या शोचा पूर्ण एपिसोड अजून प्रदर्शित झालेला नाही. येत्या शुक्रवारी हा एपिसोड सर्वांना पाहायला मिळणार आहे.

सोनालीनं लाॅकडाऊनमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत रजिस्टर मॅरेज केलं होतं आणि गतवर्षी लंडनमध्ये पुन्हा तिनं कुणालसोबत धुमधडाक्यात लग्न केलं.

महत्तवाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now