“मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णांच्या बातम्या पाहिल्या तर…” ; आरोपीच्या मित्रांची तरुणाला बेदम मारहाण

On: February 6, 2025 11:41 AM
Beed News Youth Brutally Beaten for Watching News Related to Munde and Karad
---Advertisement---

Beed News | बीड जिल्ह्यातील धारूर (Dharur) येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मसाजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या (Krishna Andhale) मित्रांनी ही मारहाण केली आहे. “मुंडे साहेब (Munde Saheb) आणि वाल्मिक अण्णा कराड (Valmik Karad) यांच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिलेस तर तुझा पण संतोष देशमुख करू,” अशी धमकी देत आरोपींनी तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला आठ टाके पडले आहेत. (Beed News )

क्षुल्लक कारणावरून वाद, तरुणावर लातूरमध्ये उपचार:

मारहाण झालेला तरुण अशोक मोहिते (Ashok Mohite) असून, त्याच्यावर लातूरमधील (Latur) सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Sahyadri Hospital) उपचार सुरू आहेत. तो आयसीयूमध्ये (ICU) दाखल आहे. आरोपी वैजनाथ बांगर (Vaijnath Bangar) आणि अभिषेक सानप (Abhishek Sanap) यांनी कराड यांच्या बातम्या का पाहतो, असा जाब विचारत अशोक मोहितेला मारहाण केली. या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी झाला होता. अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात (Ambajogai Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला लातूर येथे हलवण्यात आले आहे. (Beed News )

आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना:

या संदर्भात धारूर पोलीस ठाण्यात (Dharur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

Title : Beed News Youth Brutally Beaten for Watching News Related to Munde and Karad

 

Join WhatsApp Group

Join Now