बीड पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या गुंडागर्दीचा धक्कादायक प्रकार समोर

On: February 6, 2025 10:47 AM
Beed News Youth Brutally Attacked in a Hotel Over a Trivial Reason
---Advertisement---

Beed News | गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed) शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मसाजोगचे (Massajog) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची (Murder Case) चर्चा ताजी असतानाच, या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाल्मीक कराड (Walmik Karad) यांच्या बातम्या बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीच्या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात चार ते पाच जणांनी एका तरुणावर हॉटेलमध्ये घुसून हल्ला केला. आरोपी हॉटेलमध्ये घुसल्यानंतर दोन सेकंद थांबले आणि बेसावध असलेल्या तरुणावर फायटरने (Fighter) हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ (CCTV Video) समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. (Beed News)

मोमिनपुऱ्यातील घटना; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत:

बीड शहरातील मोमिनपुरा (Mominpura) भागात दिवसाढवळ्या गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे. मोहम्मद खलील राशिद (वय अंदाजे २५-३०) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. नजीब खान उस्मान खान, खिजर खान शरीफ खान यांच्यासह काही जणांनी चहाच्या हॉटेलमध्ये घुसून फायटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद खलील राशिद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

हल्ल्याचे कारण आणि पोलिसांची कारवाई:

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी एकाच गल्लीत राहतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या घरासमोरील रस्त्यावर नालीतील घाण टाकली होती. या प्रकाराची तक्रार मोहम्मद खलील राशिद यांनी केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना 19 जानेवारी 2025 रोजी हॉटेल शालीमारमध्ये (Hotel Shalimar) घडली. या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्यात (Peth Beed Police Station) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Beed News)

शहरात भीतीचे वातावरण:

बीड शहरात खुलेआम गुंडगिरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार का? कायद्याचा धाक शिल्लक आहे का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

Title : Beed News Youth Brutally Attacked in a Hotel Over a Trivial Reason

 

Join WhatsApp Group

Join Now