महादेव गीतेच्या पत्नीचा धक्कादायक दावा, वाल्मीक कराडचं नाव घेत म्हणाल्या…

On: April 8, 2025 8:15 AM
Beed News Mahadev Gite Wife Claims
---Advertisement---

Beed News | बीड तुरुंगातील गँगवॉरनंतर महादेव गीतेला दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे. यानंतर त्याची पत्नी मीरा गीते यांनी यामागचं कारण उघड करत, कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. या आरोपांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Beed News)

महादेव गीतेच्या पत्नीचा दावा काय?

मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेले वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर, महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बीड (Beed) जिल्हा कारागृहात हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर तातडीने कारवाई करत, महादेव गीते याच्यासह चार आरोपींना हार्सूल (Harsul) कारागृहात हलवण्यात आलं. ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर महादेव गीतेची पत्नी मीरा गीते यांनी माध्यमांसमोर धक्कादायक विधान केलं आहे.

त्यांनी सांगितले की, महादेव गीते याच्यावर कारागृहात हल्ला झाला असून, त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. मात्र, पोलीस अधीक्षकांनी यावर कारागृह प्रशासनच निर्णय घेऊ शकते, असं स्पष्ट केलं. मीरा गीते यांच्या मते, वाल्मीक कराडला कारागृहात विशेष सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणूनच त्यांच्या पतीला तिथून हलवण्यात आलं.

मीरा गीतेंची सीसीटीव्ही फुटेजची मागणी 

मीरा गीते यांनी असा दावाही केला की, त्यांच्या पतीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी खरेतर कराड गँगवर असूनसुद्धा, उलटपक्षी गीते याच्यावरच आरोप ठेवून त्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आलं. त्यांनी तुरुंगातील त्या दिवशी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असले तरी, अद्याप त्यांना ती दृश्ये मिळालेली नाहीत.

तसेच, गीते याच्या सहकार्‍यांपैकी नेहरकर कुटुंबाला तुरुंगातून फोन आला होता, आणि त्यातही कराड आणि घुले यांनी आमच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं गेलं होतं. मीरा गीते यांनी स्पष्टपणे म्हटलं की, त्यांच्या पतीवर गंभीर हल्ला झाला असूनही त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले नाही. त्यांच्या पतीच्या जीवाला कराड गँगकडून धोका आहे आणि या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. सध्या महादेव गीतेला हार्सूल तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Title : Beed News Mahadev Gite Wife Claims Jail Shift Done for Walmik

 

Join WhatsApp Group

Join Now