धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”

On: March 30, 2024 5:43 PM
Baramati Lok Sabha Election supriya sule tops the survey
---Advertisement---

Baramati Lok Sabha Election | लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. निवडणुकीला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असून राज्यात अजूनही सर्वच पक्षांची जागावाटपबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच राज्यात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ अधिक चर्चेत आहे.

येथे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापपर्यंत घोषणा जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्या बारामतीत भेटी-गाठी देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भेकराईनगर भागात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अनेक घडामोडी बाबत त्यांची भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासाही केला.

रोहित पवार यांचा मोठा दावा

अजित पवार (ajit pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार (Baramati Lok Sabha Election) संघामधून महायुतीकडून अजूनही उमेदवारी जाहीर करण्यात न आल्याबाबत रोहित पवार यांना प्रश्न करण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी एका सर्व्हेबाबत मोठी माहिती दिली.

बारामतीसाठी अजित पवार यांच्याकडून जे कोणी उमेदवार असतील. त्यांच्याबाबत अजित पवार यांच्याकडून 9 सर्व्हे करण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांचे उमेदवार मागे आहेत. तर सुप्रिया सुळे या त्यांच्या सर्व्हेमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजेच दहावा सर्व्हे करतील आणि योग्य असा निर्णय घेतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर

तसंच पुढे ते म्हणाले की, बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळे या किमान अडीच लाख मताधिक्यानी निवडून येतील, असा दावाच रोहित पवार यांनी केला आहे. भाजपने देशात आणि राज्यात पक्ष, कुटुंब फोडाफोडीची जी कार्यपद्धती अवलंबली आहे, त्यामुळे लोक खूप नाराज आहेत. याचा परिणाम म्हणजे भाजपला त्यांचाच भाजपचा मतदार मतदान करणार नाहीये, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

News Title : Baramati Lok Sabha Election supriya sule tops the survey

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती

लोकसभेसाठी ठाकरे गटाच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर

मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

‘बदनामी नको म्हणून..’, एक्स-गर्लफ्रेंडबाबत सलमानचा मोठा खुलासा

लखनऊ विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक, आज पंजाबविरुद्ध रंगणार सामना

Join WhatsApp Group

Join Now