बँक हॉलिडे अलर्ट! फेब्रुवारीमध्ये ‘या’ दिवशी बँका राहणार बंद!

On: February 3, 2025 6:06 PM
Bank Holidays
---Advertisement---

Bank Holidays l बँकांशी संबंधित महत्वाची कामे करण्यासाठी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात अनेक सुट्ट्यांचा सामना करावा लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कॅलेंडरनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकेशी संबंधित कामे वेळेवर पूर्ण करण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. ऑनलाइन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाईल बँकिंग मात्र या सुट्ट्यांच्या काळात सुरूच राहतील.

विविध राज्यात वेगवेगळ्या सुट्ट्या :

फेब्रुवारीमधील १४ दिवसांच्या सुट्ट्या असल्या तरी, सर्व राज्यांमध्ये बँका एकाच वेळी बंद राहणार नाहीत. स्थानिक सण आणि उत्सवांनुसार, प्रत्येक राज्यातील सुट्ट्यांचे दिवस वेगवेगळे असतील. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी आपल्या राज्यातील सुट्ट्यांची यादी तपासून पाहणे गरजेचे आहे.

Bank Holidays l काही महत्वाच्या सुट्ट्यांची यादी

३ फेब्रुवारीला सरस्वती पूजेमुळे आगरतळामधील बँका बंद राहतील. ११ फेब्रुवारीला थाई पूसाम सणानिमित्त चेन्नईमधील बँकांना सुट्टी असेल. १२ फेब्रुवारीला श्री रविदास जयंतीनिमित्त शिमला येथील बँका बंद राहतील. १५ फेब्रुवारीला लुई-नगाई-नी सणानिमित्त इंफाळमध्ये बँका बंद राहतील.

महाराष्ट्रातील बँकांसाठी विशेष सूचना

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूरमधील बँका बंद राहतील. तसेच, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक शहरांसह अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम येथील बँका बंद राहतील.

साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश

याशिवाय, २, ८, ९, १६, २२ आणि २३ फेब्रुवारीला अनुक्रमे रविवार, दुसरा शनिवार, रविवार, रविवार, चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्ट्या असतील. म्हणूनच, बँकेच्या कामांचे नियोजन करताना या सुट्ट्यांचाही विचार करणे आवश्यक आहे.

News title : bank-holidays-in-february-month

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now