रायगडच्या ‘या’ भागातून बांगलादेशी नागरिकाला अटक; 12 वर्षांपासून भारतात वास्तव्यास

On: January 20, 2025 10:32 AM
Reels Star Arrested
---Advertisement---

Bangladeshi Person Arrested |  घुसखोरीच्या (Infiltration) मार्गाने भारतात प्रवेश करून बेकायदा वास्तव्य करत असलेल्या मोहसीन खोकोन मुल्ला (Mohsin Khokon Mulla) याला शिवनगर (Shivnagar) येथे पोलिसांनी अटक केली. (Bangladeshi Person Arrested)

असा सापडला संशयित

बारवई पूल (Barwai Bridge) येथे मांडे (Mande) वडापाव सेंटर (Vadapav Center) येथे एक बांगलादेशी नागरिक कामासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांचे पथक (Police Team) त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी एक व्यक्ती वडापाव सेंटरसमोर उभा होता. त्याला त्याचे नाव विचारले असता, मोहसीन खोकोन शेख (Mohsin Khokon Sheikh) असे त्याने सांगितले.

बांगलादेशी कॉलिंग कंट्री कोडने (Calling Country Code) संशय बळावला

पोलिसांनी त्याच्याकडे भारतीय (Indian) असल्याबाबतचे कागदपत्र (Documents) मागितले. त्याच्याकडे असलेला मोबाइल फोन (Mobile Phone) तपासला असता, बांगलादेशी कॉलिंग कंट्री कोडने सुरू होणारे संपर्क (Contacts) मिळून आले. त्याच्याकडे बांगलादेशातून भारतात येण्याचे पासपोर्ट (Passport), व्हिसा (Visa), जन्म दाखला (Birth Certificate), इतर कागदपत्र मागितले असता, त्याने ती दिली नाहीत. (Bangladeshi Person Arrested)

१२ वर्षांपूर्वी घुसखोरी केल्याची कबुली

बारा वर्षांपूर्वी भारत-बांगलादेश सीमेवरील (India-Bangladesh Border) गस्तीवरील (Patrolling) पथकाची नजर चुकवून त्याने भारतात प्रवेश केला होता. तो रसायनी (Rasayani) परिसरात राहत असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. यावरून, मोहसीन खोकोन मुल्ला हा बांगलादेशी नागरिक असून तो १२ वर्षांपासून भारतात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला अटक करून पुढील कारवाई (Further Action) सुरू आहे. (Bangladeshi Person Arrested)

Title : Bangladeshi Person Arrested in Mohopada for illegal stay in India

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now