Ayushman Bharat Yojana l केंद्र सरकारच्या अनेक आरोग्य योजनांपैकी, आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिक घेत आहेत. या योजनेत आता मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सध्याचे निकष आणि बदल :
मोदी सरकारने (Modi Government) या योजनेचा लाभ 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान भारत वय वंदन कार्ड (Ayushman Bharat Vaya Vandan Card) दिले जाते. मात्र, आता या योजनेची वयोमर्यादा बदलण्याची शक्यता आहे.
संसदीय समितीने आयुष्मान भारत वय वंदन कार्डची वयोमर्यादा 70 वर्षांवरून 60 वर्षे करण्याची शिफारस केली आहे. तसेच, लोकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता, सर्वांना योजनेचा लाभ मिळावा, असे म्हटले आहे. उपचारांची रक्कम 5 लाखांवरून 10 लाख रुपये करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.
अनेक महागड्या आणि उच्च दर्जाच्या वैद्यकीय प्रक्रिया आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana) समाविष्ट नाहीत, असे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. सीटी स्कॅन (CT Scan), एमआरआय (MRI) आणि न्यूक्लियर इमेजिंग (Nuclear Imaging) यांसारख्या चाचण्यांचा समावेश करण्याची शिफारस समितीने केली आहे.
Ayushman Bharat Yojana l ‘आयुष्मान कार्ड’ (‘Ayushman Card’) ऑनलाइन कसे मिळवाल? :
-गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) ‘आयुष्मान’ ॲप (App) डाउनलोड करा.
– मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
– तुमची पात्रता तपासा.
– पात्र असल्यास, आधार ई-केवायसी (Aadhaar e-KYC) करा.
– फोटो अपलोड करा.
– या प्रक्रियेनंतर तुमचे ‘आयुष्मान कार्ड’ तयार होईल.
– तुम्ही https://mera.pmjay.gov.in/ या वेबसाइटवरून देखील कार्ड डाउनलोड करू शकता.






