Chanakya Niti | तारुण्य म्हणजे सळसळतं रक्त (Energetic). तारुण्यात बरंच काही करण्याचा जोश असतो, त्यामुळे चुकाही होतात. अशाच काही तारुण्यातील चुका ज्या आयुष्यभर महागात पडू शकतात, याचा उल्लेख चाणक्य नीतीमध्ये आहे. वयाची विशी ओलांडल्यानंतर या चुका करू नका, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
वेळेचा सदुपयोग करा
वेळ खूप किमती आहे. एकदा का ती निघून गेली की पुन्हा येत नाही. त्यामुळे वेळेचा अपव्यय करू नका. वेळ वाया घालवणाऱ्यांना आयुष्यभर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचे भान ठेवणे आणि वेळेचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.
आळशीपणा टाळा
प्रत्येक कार्यासाठी तत्पर राहायला हवं. दुर्लक्षपणा केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपले कार्य वेळेवरच करा. यामुळे जीवनात यश मिळण्याची शक्यता अधिक असते.
पैशांचा (Money) योग्य वापर करा
पैसा विचारपूर्वकच (Thoughtfully) खर्च करावा. तरुणावस्थेत पैशांचे महत्त्व समजायला हवे. पैसाच भविष्यातील (Future) संकटात (Crisis) कामी येतो.
माणसाचा सर्वात मोठा शत्रू (Enemy) आहे राग. रागात व्यक्तीची विचार करण्याची, समजण्याची क्षमता (Thinking Capacity) नष्ट होते. पण वयाच्या विशीनंतर प्रतिक्रिया (Reaction) देताना विचार करा.
तरुण वयात राग जास्त येतो, तो कंट्रोल करणे सोपे नसते. त्यासाठी योग (Yoga) आणि ध्यानाची (Meditation) मदत घ्या.






