मोबाईलचा अतिवापर करतोय गंभीर परिणाम, धक्कादायक माहिती समोर

On: January 25, 2025 10:38 AM
Mobile use
---Advertisement---

Mobile use l आजच्या काळात मोबाईल (Mobile) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक जण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर (Mobile) व्हिडिओ (Videos) पाहतात, गाणी ऐकतात. परंतु, रात्री उशिरापर्यंत मोबाईल (Mobile) पाहिल्याने झोपेवर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा थेट संबंध आरोग्याशी जोडलेला आहे. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरात मेलॅटोनिन (Melatonin) हार्मोनची (Hormone) कमतरता भासते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने किमान ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी मोबाईलचा (Mobile) वापर टाळणे हा उत्तम उपाय ठरू शकतो, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

मोबाईलचा (Mobile) अतिवापर आणि झोपेवर परिणाम :

रात्री उशिरापर्यंत मोबाईल (Mobile) फोन (Phone) वापरल्याने झोपेवर मोठा दुष्परिणाम होतो. सतत फोन (Phone) वापरल्याने झोप पूर्ण होत नाही आणि शरीरात मेलॅटोनिन (Melatonin) हार्मोनची (Hormone) कमतरता निर्माण होते.

मेलॅटोनिन (Melatonin) हे हार्मोन (Hormone) झोपेचे नियमन करते. त्याच्या कमतरतेमुळे झोप न लागणे, मध्येच जाग येणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्या उद्भवतात.

Mobile use l झोपेसाठी आवश्यक बाबी :

उत्तम झोपेसाठी बेडरूममधील (Bedroom) वातावरण झोपेसाठी पोषक असणे गरजेचे आहे. खोलीत पुरेसा अंधार आणि शांतता असणे महत्त्वाचे आहे.

आवश्यक वाटल्यास मंद आवाजात संगीत सुरू ठेवावे, जेणेकरून बाहेरील आवाजांकडे लक्ष विचलित होणार नाही. शांत झोप येण्यास यामुळे मदत होईल. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे किंवा संगणकावर काम करणे टाळावे.

आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची :

तज्ज्ञांच्या मते, चिंता आणि तणावामुळे अनेकांना झोप लागत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईल (Mobile) पाहणे हेच आहे.

झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास कोणताही स्क्रीन (Screen) पाहू नये. पुरेशी झोप न झाल्यास त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे असून, अनावश्यक गोष्टींचा विचार आणि चिंता करणे टाळले पाहिजे.

दर २० मिनिटांनी ब्रेक (Break) घ्या :

सतत स्क्रीनच्या (Screen) संपर्कात असणाऱ्यांनी दर २० मिनिटांनी ब्रेक (Break) घ्यावा. आजूबाजूला झाडे असतील तर स्क्रीनपासून (Screen) डोळे बाजूला वळवून काही वेळ नैसर्गिक हिरव्या रंगाकडे पहावे.

त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण कमी होण्यास मदत होईल. दर २० मिनिटांनी २० फूट दूर असलेली वस्तू २० सेकंदांसाठी पाहावी.

News title : Avoid Mobile Phones Before Sleep for Better Health

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now