ATM charges 2025 l बँकेतून रोख रक्कम काढणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि थोडीशी निराशाजनक बातमी समोर आली आहे. 1 मे 2025 पासून एटीएममधून पैसे काढणे अधिक महाग होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या निर्णयानुसार इंटरचेंज फी आणि गैर-वित्तीय व्यवहारांवरील शुल्कात वाढ होणार आहे. (ATM charges 2025)
काय आहे इंटरचेंज फी? :
जेव्हा एखादा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा ती बँक त्या व्यवहारासाठी ग्राहकाच्या मूळ बँकेकडून एक शुल्क आकारते. यालाच इंटरचेंज फी म्हणतात. हीच रक्कम पुढे ग्राहकाकडून वसूल केली जाते. (ATM New charges 2025)
सध्या ग्राहकांकडून प्रत्येक अतिरिक्त एटीएम व्यवहारासाठी 21 रुपये शुल्क आकारले जाते. नवीन दरांनुसार, ही रक्कम 24 रुपये होणार आहे. याशिवाय, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणी, पिन चेंज यांसारख्या गैर-वित्तीय व्यवहारांवरही शुल्क वाढ करण्यात आले आहे. सध्याचे 5 रुपये शुल्क आता 8 रुपये होणार असल्याची शक्यता आहे.
ATM charges 2025 l किती एटीएम व्यवहार मोफत? :
RBI च्या नियमांनुसार:
– मेट्रो शहरांतील ग्राहकांना दरमहा 3 मोफत व्यवहार (रोख काढणे किंवा गैर-वित्तीय व्यवहार)
– इतर शहरांतील ग्राहकांना 5 मोफत व्यवहार
– या मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास शुल्क आकारले जाते.
ATM charges 2025 l फेल झालेल्या व्यवहारांवर शुल्क लागेल का? :
खूप वेळा एटीएम व्यवहार फेल होतात. यावर RBI ने 14 ऑगस्ट 2019 रोजी स्पष्ट केलं आहे की, हार्डवेअर-सॉफ्टवेअर बिघाड, पैसे उपलब्ध नसणे, नेटवर्क प्रॉब्लेम किंवा चुकीचा पिन टाकल्यामुळे व्यवहार फेल झाल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. (ATM charges 2025)
या निर्णयाचा परिणाम थेट सामान्य ग्राहकांच्या खिशावर (ATM charges 2025) होणार आहे. विशेषतः जे नागरिक दरमहा अनेक वेळा एटीएम वापरतात, त्यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील. डिजिटल व्यवहार वाढत असले तरी, ग्रामीण भागातील आणि वयोवृद्ध ग्राहकांचा एटीएमवर अजूनही मोठा अवलंब आहे. त्यामुळे हा निर्णय अनेकांसाठी आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो.






