Elon Musk l अमेरिकेतील प्रसिद्ध ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) (Make America Great Again (MAGA)) समर्थक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अॅशली सेंट क्लेअर (वय ३१) हिने एक धक्कादायक खुलासा करून सोशल मीडियावर (Social media) खळबळ उडवून दिली आहे.
तिने दावा केला आहे की, तिला इलॉन मस्कपासून (Elon Musk) मुलगा झाला आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) दिवशी तिने हा खुलासा केला आणि सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून बाळाच्या वडिलांचे नाव इलॉन मस्क (Elon Musk) आहे. “मी यापूर्वी हे जाहीर केले नव्हते, कारण मला माझ्या मुलाच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी होती. परंतु, काही वृत्तपत्रे ही गोष्ट उघड करणार असल्याचे समजले आहे,” असे तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘मुलाला सामान्य जीवन जगू द्या’ :
तिने पुढे माध्यमांना विनंती केली की, माझ्या मुलाला एक सामान्य आणि सुरक्षित आयुष्य मिळावे, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे माध्यमांनी कृपया त्याच्या खासगी आयुष्याचा आदर करावा आणि विनाकारण त्यात हस्तक्षेप करू नये.
दरम्यान, इलॉन मस्कने (Elon Musk) या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मस्कच्या वकिलांशी संपर्क साधला जात आहे. इलॉन मस्कला (Elon Musk) सध्या 12 मुले आहेत. मस्क यांना पहिली पत्नी जस्टिनपासून सहा मुलं, संगीतकार ग्राइम्सपासून तीन मुलं आणि न्यूरालिंकच्या (Neuralink) माजी संचालक शिवॉन जिलिसपासूनही तीन मुलं आहेत.
नुकतीच मस्क यांनी व्हाईट हाउसमध्ये (White House) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली होती. यावेळी मस्कची 3 मुले देखील उपस्थित होती. त्यांचा सर्वात लहान मुलगा पहिल्यांदाच दिसला होता.






