माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ दोन अभिनेत्रींनी काम करावं! आशा भोसले यांनी स्पष्टच सांगितलं होतं

On: April 13, 2026 1:47 PM
Asha Bhosle Biopic
---Advertisement---

Asha Bhosle Biopic | प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. तब्बल आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गात भारतीय संगीताला नवी उंची दिली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर बायोपिक येण्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर 2018 साली दिलेल्या एका मुलाखतीतील त्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. “माझ्या आयुष्यावर चित्रपट आला तर माझी भूमिका कोण साकारेल?” या प्रश्नावर त्यांनी अतिशय रोचक उत्तर दिले होते.

या दोन अभिनेत्रींची घेतली होती नावं

आशा भोसले (Asha Bhosle) यांनी सांगितले होते की, “मला वाटतं (प्रियांका चोप्रा) Priyanka Chopra Jonas माझी भूमिका खूप छान साकारू शकते. ती माझ्या व्यक्तिरेखेला न्याय देईल.”

त्याचबरोबर त्यांनी Kangana Ranaut यांचेही नाव घेतले होते. “कंगना रणौत देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती सुद्धा माझ्या भूमिकेसाठी योग्य पर्याय ठरू शकते,” असे त्यांनी म्हटले होते.

Asha Bhosle Biopic | आयुष्य एक सिनेमासारखं :

या मुलाखतीत त्यांनी एक मजेशीर गोष्टही सांगितली होती. “हे सगळं असूनही माझ्या आयुष्यावर चित्रपट बनेल असं मला वाटत नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्यांचे आयुष्य हे एखाद्या सिनेमाच्या कथेसारखेच आहे.

गरीबीपासून सुरुवात करून संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या Asha Bhosle यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या बहिणी Lata Mangeshkar यांच्यासोबतचे नाते, तसेच संगीतकार R. D. Burman यांच्याशी असलेले संबंध हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ठरले.

News Title: Asha Bhosle Once Chose Priyanka Chopra and Kangana Ranaut for Her Biopic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now