आपला मोठा झटका; अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांचा दारूण पराभव

On: February 8, 2025 2:42 PM
Delhi Election 2025
---Advertisement---

Delhi Election 2025 l दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election 2025) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) एकामागून एक धक्के बसत आहेत. 10 वर्षे सलग दिल्लीत सत्ता गाजवल्यानंतर ‘आप’ला आता सत्तेबाहेर जावे लागले आहे. याचवेळी भाजप (BJP) तब्बल 25 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन करत आहे.

केजरीवाल यांना एक धक्का बसून सावरत नाही तोच उपमुख्यमंत्री आणि ‘आप’चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाल्याची बातमी आली. आता त्याही पुढे जात अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाल्याने ‘आप’साठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपला 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता, ‘आप’चा पराभव :

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले असून, 47 जागांवर विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्ष केवळ 23 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस (Congress) पक्षाचा तर संपूर्णपणे सुफडा साफ झाला आहे आणि त्यांना एकही जागा मिळालेली नाही. यामुळे 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

Delhi Election 2025 l केजरीवाल यांचा 3186 मतांनी पराभव :

नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी 3186 मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. ‘आप’च्या गोटात हा सर्वात मोठा धक्का मानला जात असून, संपूर्ण पक्षासाठी ही धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे.

जंगपुरा मतदारसंघात भाजपच्या तरविंदर सिंग मारवाह (Tavinder Singh Marwah) यांनी मनीष सिसोदिया यांना 600 मतांनी पराभूत केले. तसेच राजेंद्र नगर मतदारसंघातून ‘आप’चे दुर्गेश पाठक (Durgesh Pathak) यांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांनी पराभव स्वीकारत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पक्षाची आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मान्य केले.

सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी (Atishi) यांना पराभवाची टांगती तलवार होती, मात्र शेवटच्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि 2700 मतांनी विजय मिळवला. कालकाजी मतदारसंघात त्यांनी भाजपच्या रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांचा पराभव केला. मात्र, मालवीय नगरमधून ‘आप’चे सोमनाथ भारती (Somnath Bharti) पराभूत झाले आहेत.

‘आप’च्या कार्यालयात शांतता, भाजपमध्ये जल्लोष :

दिल्ली निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ‘आप’च्या सर्व कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरला आहे. पक्ष कार्यालयाला आतून टाळे ठोकण्यात आले असून, प्रवेश बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, भाजपच्या गोटात जल्लोष सुरू असून, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आनंद साजरा केला आहे.

दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल :

या निवडणुकीनंतर दिल्लीच्या राजकारणात मोठा बदल घडलेला आहे. आता भाजपची सत्ता निश्चित झाली असून, नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News title : Arvind Kejriwal loses Delhi, BJP wins after 25 years

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now