वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत अंजली दमानिया यांचा मोठा खुलासा!

On: January 25, 2025 3:53 PM
Walmik Karad Encounter
---Advertisement---

Anjali Damania | संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने त्या वाल्मिक कराड विषयी धक्कादायक खुलासे करत आहेत.

नुकताच दमानिया यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. “वाल्मिक कराड ठणठणीत आहेत.

खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना, अगदी ठणठणीत होते ना? मग अशांना दयामाया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट (Blood Test), सीटी स्कॅन (CT Scan) आणि सोनोग्राफीचे (Sonography) रिपोर्ट सार्वजनिक करा (with films). आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला (Arthur Road) करा,” अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.

दमानिया यांच्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाल्मिक कराड खरोखरच ठणठणीत तर नाही ना? त्याला वाचवण्यासाठी त्याला दवाखान्यात भरती केले का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.

एसआयटी करणार वाल्मिक कराडची संपत्ती जप्त?

महत्त्वाची बाब म्हणजे, आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी बीड (Beed) येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित करण्यात आला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरू शकतो. याआधी सीआयडीने (CID) कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. (Anjali Damania)

Title : Anjali Damania Questions Walmik Karads Health Condition

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now