डॉक्टरची कुंडली सांगत अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा!

On: January 27, 2025 5:11 PM
Anjali Damania
---Advertisement---

Anjali Damania | मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा तपास वेगाने सुरू असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालावर (Postmortem Report) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन करणारे डॉ. अशोक थोरात (Dr. Ashok Thorat) हे राजकीय (Political) पार्श्वभूमी असलेले व्यक्ती असून, आंबाजोगाई (Ambejogai) शहरात त्यांचे मोठे हॉटेल (Hotel) आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य आहे का? अशी शंका अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनीही डॉ. थोरात यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडसह (Walmik Karad) जवळपास आठ आरोपी अटकेत आहेत. एकीकडे हत्येची चौकशी सुरू असताना दुसरीकडे देशमुख कुटुंबीयही न्याय मागण्याकरिता विविध मोर्चांमध्ये सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सोमवारी अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवर शंका उपस्थित केली.

डॉ. अशोक थोरातांवर आरोप

अशोक थोरात यांचा पेशा डॉक्टरकीचा असला तरी आंबाजोगाई शहरात त्यांचे मोठे हॉटेल आहे. अशोक थोरात हे राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्ती आहेत. मध्यंतरी लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (Vidhan Sabha) निवडणूक लढविण्याचा त्यांचा विचार होता, अशी माझी माहिती आहे. (Anjali Damania)

राजकीय संबंध असलेल्या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन केले असल्याने त्यांनी दिलेले अहवाल योग्य आहेत का? असा सवाल करत दमानिया यांनी थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

धनंजय देशमुखांची स्पष्टीकरणाची मागणी

अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या आरोपानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही डॉ. थोरात यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप आणि व्यक्त केलेली शंका पाहता, डॉ. थोरात यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून खुलासा करावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Title : Anjali Damania questions on postmortem report of santosh deshmukh  

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now