“बजेट देशाचं की बिहार-आंध्र प्रदेशचं?”; अमोल कोल्हेंची संतप्त प्रतिक्रिया

On: July 23, 2024 4:45 PM
Amol Kolhe Slam To Modi Government Against Maharashtra About Union Budget 2024 25
---Advertisement---

Amol Kolhe | नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अनेक गोष्टीबाबत घोषणा केली. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घोषणा केली आहे. कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या वस्तू स्वस्त होतील याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक घोषणा या बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी करण्यातआल्या आहे.     याबाबत राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘घालीन लोटांगण वंदीन बिहार’

यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार टिकून ठेवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. अशातच आता राज्यातील विविध नेत्यांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहेत. ‘घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्याने पाहिलं आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो’ असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी अशी कविता रचली आहे. तसेच आंध्रप्रदेश आणि बिहारला खैरात वाटली असून महाराष्ट्राला यापासून लांब ठेवलं गेलं असल्याचं अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत.

यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. जेडीयू आणि टीडीपी या दोन कुबड्याच्या अधारावर म्हणजे या पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून बिहार-आंध्रप्रदेशला खैरात देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केला आहे. त्याचवेळी देशाला महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.

आंध्रप्रदेश आणि बिहारला निधी दिला याचं दुख नाही, तर देशातील सर्वाधिक महसूल असणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. जे वारंवार कामासाठी ट्रिपल इंजिन सरकार दिल्ली दौरे करत नेमकं काय करतात? असा सवाल आता अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) केला आहे.

आंध्रप्रदेशसाठी 15 हजार कोटींचा निधी

चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीला आंध्रप्रदेशची राजधानी बनवायची असून विकसित देखील करायची आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून 15 हजार कोटींची तरतूद करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15 हजार कोटींची घोषणा करण्यात आली.

News Title – Amol Kolhe Slam Modi Government over Budget

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!

घराचं स्वप्न होणार साकार! मोदी सरकारची अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर मोठी घोषणा

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बजेटमध्ये मोठी घोषणा

मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?; वाचा सविस्तर

मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा

 

Join WhatsApp Group

Join Now