“मी या जगाचा निरोप घेईन, तेव्हा…”; अमिताभ बच्चन यांचा मालमत्तेबाबत मोठा खुलासा

On: February 11, 2025 3:15 PM
Amitabh Bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( सध्या त्यांच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आले आहेत. “जाने का समय…” असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. या पोस्टनंतर बिग बीच्या रिटायरमेंटच्या चर्चांना उधाण आले असून, याच्या मागे एक जुना इंटरव्यू देखील व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये “जाने का समय…” या शब्दांनी चाहत्यांना चिंतेत टाकले आहे. त्यांच्या पोस्टमुळे चाहते खूप चिंतित झाले आहेत आणि अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, बिग बी यांनी त्यांचा करिअर संपवण्याचा निर्णय घेतला आहे का? ट्विटरवर ही पोस्ट पाहून चाहत्यांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

जुना इंटरव्यू व्हायरल

बिग बींच्या ट्वीटसोबतच त्यांचा एक जुना इंटरव्यू सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. Reddit वर दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, “ज्यावेळी मी या जगाचा निरोप घेईन, तेव्हा माझ्या संपत्तीचं समसमान वाटप माझ्या मुलगी आणि मुलाला केलं जाईल. यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही.”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलांचा, अभिषेक आणि श्वेता बच्चन नंदा यांचा वारसा समान प्रमाणात वाटण्याचा निर्णय घेतला आहे. हे सांगताना बिग बी म्हणाले की, “माझ्या मुलीच्या अधिकारांत कमीपणाचा काहीही विषय नाही. ती आमच्याच कुटुंबाची भाग आहे, आणि अभिषेक इतकाच तिचा अधिकार आहे.”

श्वेता बच्चनला गिफ्ट केलेला बंगला

बिग बीने आपल्या मुलीला श्वेता बच्चनला 50 कोटी रुपयांच्या किमतीचा बंगला गिफ्ट दिला आहे, हे देखील चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या मुलांना समान अधिकार देण्याच्या त्याच्या निर्णयामुळे ते एक आदर्श पालक म्हणून पाहिले जात आहेत.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now