82 व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचं टेन्शन वाढलं, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मागितला उपाय!

On: April 17, 2025 7:58 PM
amitabh bachchan
---Advertisement---

Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयाबरोबरच विनोदी शैलीसाठीही ओळखले जातात. सोशल मीडियावरही ते सातत्याने सक्रिय असतात. नुकताच त्यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वरील फॉलोअर्स वाढत नसल्याबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे, जी अल्पावधीतच प्रचंड व्हायरल झाली आहे.

बिग बी चिंतेत, नेमका प्रकार काय?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे X (Twitter) वर ४९ दशलक्ष तर इंस्टाग्रामवर ३७.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तरीही त्यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या वाढत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ८२ वर्षीय बच्चन यांनी १४ एप्रिलच्या मध्यरात्री १२:०९ वाजता एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “खूप प्रयत्न करतोय पण फॉलोअर्स ४ कोटी ९० लाखांवरच थांबलेत… काही उपाय असेल तर सांगा.” त्यांच्या या मिश्किल पोस्टवर नेटकऱ्यांनी लगेचच वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.

नेटकऱ्यांचे भन्नाट उपाय, पण यश न मिळाल्याची कबुली

बच्चन यांच्या फॉलोअर्स वाढवण्यासाठी अनेकांनी सल्ले दिले – कुणी त्यांना न्यूज शेअर करण्यास सांगितलं, तर कुणी राजकीय मुद्यांवर मत मांडण्यास सांगितलं. काहींनी त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्यासोबत फोटो टाकण्याचा सल्लाही दिला. या सगळ्या सल्ल्यांमुळे पोस्ट अजूनच गाजली.

मात्र, यापैकी एकही सल्ला उपयोगी ठरला नाही, अशी मिश्किल कबुली खुद्द अमिताभ बच्चन यांनीच दिली. त्यांनी X वर पुन्हा एक पोस्ट करत लिहिलं, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे आभार… पण क्षमस्व, यापैकी काहीही चाललं नाही!”

News Title- Amitabh Bachchan Viral Tweet on Follower Count

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now