अटकेनंतर अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

On: December 14, 2024 1:23 PM
Allu Arjun
---Advertisement---

Allu Arjun | साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. तेलंगणा हायकोर्टने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी काल (13 डिसेंबर) अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र अखेर आज सकाळी त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे.

अंतरिम जामीन मंजूर :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दाखल करण्यात आल्या गुन्ह्याप्रकरणी अल्लू अर्जुन याला काल (13 डिसेंबर) दुपारी अटक करण्यात आली होती. मात्र अभिनेत्याने रात्रभर तुरूंगात काढल्यावर आज सकाळच्या सुमारास त्याची सुटका झाली आहे. मात्र यावेळी तो अंतरिम जामिनावर बाहेर पडला आहे.

यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याला रिसीव्ह करण्यासाठी त्याचे वडील आणि फिल्म प्रोड्युसर अल्लू अरविंद यांच्यासह त्याचे सासरे देखील पोहोचले होते. तसेच तेलंगणा उच्च न्यायालयाने अभिनेता अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन देखील मंजूर केला होता. मात्र जेलमधून बाहेर पडल्यानंतर अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.

Allu Arjun | अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया काय दिली? :

यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘मला जे प्रेम आणि पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तसेच मी माझ्या सर्व चाहत्यांचे देखील मनापासून आभार मानतो, परंतु, आता काळजी करण्यासारखं काहीही नाही. कारण मी सुरक्षित आहे, ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीही नाहीये.

दरम्यान, मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. तसेच मी कायद्याचा देखील आदर करतो. याशिवाय या तपासात मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करेन. तसेच जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती, त्याबद्दल मला खेद आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

News Title – Allu Arjuns first reaction on his arrest in Hyderabad theatre 

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, पाहा संपूर्ण यादी

कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार

सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now