महाराष्ट्रात पावसाची उघडीप, ‘या’ भागांत हलक्या सरींची शक्यता

On: August 21, 2026 12:04 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रातील हवामानात 21 ऑगस्ट रोजी मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला असून, सध्या कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी राहतील, तर अनेक भागांत दमट, उष्ण आणि कोरडे हवामान जाणवण्याची शक्यता आहे.

कोकणासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप

कोकण विभागातील मुंबई, ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 21 ऑगस्ट रोजी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. या परिसरातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मात्र पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर तुलनेने कमीच राहण्याचा अंदाज आहे. दमट वातावरण कायम असताना काही काळ सूर्यदर्शन होण्याची शक्यताही आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि नाशिक (Nashik) या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या भागातील पावसाची तूट वाढताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस वेळेत न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे.

Maharashtra Weather Update | मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही दिलासा :

पुणे, सातारा (Satara), कोल्हापूर, सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्येही पावसाचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक किंवा हलक्या सरी पडतील, मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. घाटमाथ्यावरील भागातही मान्सून काही काळासाठी शांत राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या पावसापासून दिलासा मिळत असला तरी शेतीसाठी ही उघडीप चिंतेची बाब ठरू शकते.

मराठवाड्यातील परिस्थितीतही 21 ऑगस्टला बदल झाला आहे. गुरुवारी काही जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र आता विभागातील एकाही जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर, परभणी (Parbhani), बीड (Beed), हिंगोली, नांदेड (Nanded) आणि लातूर (Latur) या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. परंतु जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याने पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागांत दुबार पेरणीची वेळ येण्याची तसेच शेतात उभ्या असलेल्या पिकांच्या नुकसानीची चिंता कायम आहे.

News title : Maharashtra Weather Update Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now