Akshaya Tritiya 2026 | हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही कार्य अक्षय (कधीही न संपणारे) पुण्य देणारे मानले जाते. त्यामुळे बहुतांश लोक या दिवशी सोने-चांदी खरेदी करतात. मात्र, प्रत्येकालाच महाग वस्तू खरेदी करणं शक्य नसतं.
अशा वेळी कमी खर्चातही तुम्ही हा दिवस शुभ बनवू शकता. काही साध्या आणि रोजच्या वापरातील वस्तू खरेदी करणंही तितकंच लाभदायक मानलं जातं.
‘या’ वस्तू खरेदी करणं ठरू शकतं शुभ :
मातीच्या वस्तू:
मडकं, दिवा किंवा कुंडी यांसारख्या मातीच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शांतता टिकते.
तांब्याची भांडी:
तांबा हा पवित्र धातू मानला जातो. या दिवशी तांब्याचं भांडं घेतल्यास आरोग्य आणि समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे. (Akshaya Tritiya 2026)
हळद आणि तांदूळ:
पूजेत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू पवित्रतेचं प्रतीक आहेत. अक्षय्य तृतीयेला यांची खरेदी केल्यास घरात मंगलमय वातावरण राहते.
Akshaya Tritiya 2026 | धनवृद्धीसाठी खास मानल्या जाणाऱ्या वस्तू:
धणे :
धणे खरेदी करणं धनवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होते, अशी मान्यता आहे.
लाल कापड किंवा कापूस:
पूजेसाठी वापरलं जाणारं लाल कापड किंवा कापूस खरेदी करणंही शुभ ठरतं. हे लक्ष्मीपूजेसाठी उपयुक्त मानलं जातं.
जर या दिवशी काहीही खरेदी करणं शक्य नसेल, तर गरजूंना दान करणं हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. दान केल्याने मानसिक समाधान मिळतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
सोने-चांदी खरेदीचा शुभ मुहूर्त :
सकाळी: 10:49 ते 12:21
दुपारी: 1:58 ते 3:35
संध्याकाळी: 6:50 ते 10:58
रात्री: 1:43 ते 3:06






