‘अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट’; खळबळजनक दावा समोर

On: January 20, 2025 5:49 PM
Akshay Shinde Encounter
---Advertisement---

Akshay Shinde Encounter l बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या चालवल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने एक चौकशी समिती गठीत केली होती.

Akshay Shinde Encounter l चौकशी समितीचा अहवाल सादर; पोलिसांवर ताशेरे

या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला सर्वस्वी पोलीसच जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सादर करण्यात आला आहे.

स्वसंरक्षणार्थ अक्षयचा एन्काऊंटर केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिसांनीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला असून यामध्ये पाच पोलीस जबाबदार असल्याची माहिती आहे.

न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

News Title l Akshay Shinde encounter fake, reveals inquiry report; Five policemen held responsible

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now