अजित पवारांच्या नेत्यांना स्पष्ट सूचना, म्हणाले ‘पक्षाला अडचण…’

On: January 29, 2025 4:21 PM
Ajit Pawar Death
---Advertisement---

Ajit Pawar l राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढत असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त गोष्टी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अजित पवार काय म्हणाले? :

देवगिरी येथे पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणणाऱ्या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा वादग्रस्त उमेदवारांना संधी देऊ नका, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या आणि योग्य उमेदवार शोधा, तसेच पक्षाच्या गटबाजीमुळे संधी हुकणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 25 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 207 नगरपालिका आणि 284 नगरपंचायतींच्या निवडणुका अद्याप स्पष्ट नाहीत.

निवडणुका लांबणीवर गेल्याने पक्षांना रणनीती आखण्यासाठी वेळ मिळेल. महाविकास आघाडीनेही आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर शिंदे-फडणवीस सरकारकडून आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. केंद्राच्या धोरणांवरून भाजप-शिंदे गट प्रचारात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाने आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. “पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात, त्यामुळे नियोजनपूर्वक काम करा,” असे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमुळे निवडणुका लांबणीवर गेल्या असल्या तरी, अजित पवार यांनी वादग्रस्त बाबी टाळण्याच्या सूचना देत पक्षासाठी मजबूत उमेदवार निवडण्यावर भर दिला आहे.

News title : Ajit Pawar big statment 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now