Aishwarya Rai | बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य सतत चर्चेत असतं. सोशल मीडिया, वर्तमानपत्रं आणि टीव्ही स्क्रीन्सवर दररोज त्यांच्या नात्यांच्या बातम्या झळकत असतात. लग्न, ब्रेकअप, प्रेमप्रकरणं, प्रेग्नंसी आणि चित्रपट – सर्व काही सतत चर्चेत असतं.
सलमान-ऐश्वर्याचं नातं-
90च्या दशकात सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांचं नातं हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित प्रकरण ठरलं. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात त्यांच्या जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं.
चित्रपटातली केमिस्ट्री प्रत्यक्षातही उतरल्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेकांच्या नजरा खिळल्या. त्या काळात दोघंही त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते आणि त्यांचं प्रेमप्रकरण बॉलिवूडमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं.
लोनावळ्यात गुप्त निकाह? –
एक वेळ अशी होती की अफवा पसरल्या की सलमान आणि ऐश्वर्या यांनी गुपचूप लोनावळ्यातील एका बंगल्यामध्ये निकाह केला. यासोबतच ऐश्वर्याने इस्लाम स्वीकारल्याचंही बोललं गेलं. त्यांच्या कुटुंबीयांनीही या लग्नाला हजेरी लावली नाही, अशा बातम्याही समोर आल्या.
इतकंच नाही, तर त्यांच्या हनिमूनसाठी दोघं न्यूयॉर्कला गेले होते, असंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये छापून आलं. अशा बातम्यांनी केवळ चाहत्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली.
ऐश्वर्याचं स्पष्ट उत्तर-
या अफवांमुळे ऐश्वर्या रायने स्वतः पुढे येऊन या चर्चांवर स्पष्ट भूमिका घेतली. ती म्हणाली, “जर असं काही घडलं असतं, तर आपली फिल्म इंडस्ट्री इतकी लहान आहे की हे कुणापासूनही लपलं नसतं. माझ्या आईच्या अपघातानंतर मला कुटुंबासाठीसुद्धा वेळ मिळाला नाही.
मी अशा प्रकारची व्यक्ती नाही की इतकं मोठं काही लपवून ठेवेन. जर माझं खरंच लग्न झालं असतं, तर मी ते संपूर्ण जगासमोर अभिमानाने जाहीर केलं असतं. पण सध्या माझ्यासाठी लग्नाचा योग्य वेळ नाही.”






