डोसे खाल्ल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, पण कारण काही वेगळंच; पोलीस तपास समोर

On: April 10, 2026 1:03 PM
Dosa Death Case
---Advertisement---

Dosa Death Case | गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad) शहरात घडलेल्या दोन निष्पाप बहिणींच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. सुरुवातीला डोसा खाल्ल्यामुळे फूड पॉयजनिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, तपास पुढे जात असताना या प्रकरणात अत्यंत गंभीर आणि अनपेक्षित माहिती समोर आली असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

फॉरेन्सिक अहवालातून मोठा खुलासा :

चांदखेडा परिसरात घडलेल्या या घटनेत सुरुवातीला डोशासाठी वापरलेल्या खीरूमुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मुलींच्या आजोबांनीही डेअरीमधून आणलेल्या खीरूवर संशय घेतला होता. पोलिसांनी तत्काळ ते खीरू जप्त करून तपासासाठी पाठवले. मात्र, Forensic Science Laboratory च्या अहवालानुसार हा प्रकार अन्न विषबाधेमुळे झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. (Dosa Death Case)

तपासात असे उघड झाले की, मृत्यूमागे विषारी पदार्थ कारणीभूत होता. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा पूर्णपणे बदलली असून आता आत्महत्या किंवा हत्या या शक्यतांवर सखोल चौकशी सुरू आहे. आई-वडील विमल प्रजापती (Vimal Prajapati) आणि भावना प्रजापती (Bhavana Prajapati) यांचे रक्तनमुने तपासले असता त्यामध्येही विषारी घटक आढळून आले. हे घटक ‘सल्फास’ या किटकनाशकात आढळतात, जे प्रामुख्याने धान्य साठवण्यासाठी वापरले जाते.

Dosa Death Case | कौटुंबिक तणाव आणि संशयाचा वेध :

पोलिसांना विमल प्रजापती यांच्या घरातून सल्फासच्या गोळ्या सापडल्या असून त्यांची तपासणी सुरू आहे. १ एप्रिलच्या रात्री विमल डेअरीमधून डोसा बनवण्यासाठी खीरू घेऊन आला होता. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने डोसे खाल्ले. मात्र, विष डोशामध्ये मिसळले गेले होते की अन्य कोणत्या मार्गाने शरीरात गेले, याचा तपास सध्या सुरू आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुटुंबाच्या आर्थिक आणि वैयक्तिक परिस्थितीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. विमल प्रजापती दीर्घकाळ बेरोजगार असल्याची माहिती समोर आली आहे. तो मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करत होता तसेच परदेशात जाण्याचाही विचार करत होता. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंबातील तणाव वाढल्याचेही समोर आले आहे. भावना प्रजापती यांच्या वडिलांचे मेडिकल स्टोअर असल्याने विषाचा स्रोत तिथून असण्याची शक्यता तपासली जात आहे.

या प्रकरणात आजी-आजोबांचीही सखोल चौकशी केली जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत कुटुंबातील कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

News Title: Ahmedabad Dosa Death Mystery Deepens

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now