Agra Suicide Case | आग्रा (Agra) येथे एका टीसीएस रिक्रूटमेंट मॅनेजरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून लाईव्ह व्हिडिओ (Live Video) बनवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २४ फेब्रुवारी रोजी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. (Agra Suicide Case)
24 फेब्रुवारी रोजी सकाळी मानवने खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला. सकाळी कुटुंबातील सदस्यांनी मानवला पंख्याला लटकलेले पाहिले तेव्हा एकच गोंधळ उडाला. कुटुंबीयांनी मानवला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मानवने आत्महत्या करण्यापूर्वी 6.57 मिनिटांचा व्हिडिओ बनवला. त्यात तो म्हणत आहे की पुरूषांबद्दलही विचार करा, कृपया कोणीतरी पुरूषांबद्दल बोलले पाहिजे. बिचारे खूप एकटे आहेत, माफ करा पप्पा मम्मी, माफ करा अक्कू. मी गेल्यावर सगळं ठीक होईल, माझ्या आत्महत्येबद्दल माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका.
व्हिडिओमधील हृदयद्रावक संदेश
आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, “आई-बाबा, मला माफ करा. मी पत्नीला कंटाळलो आहे. कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकाकी पडतात. पत्नी धमक्या देत आहे. तिचे बाहेर प्रेमसंबंध आहेत.” यानंतर तो रडू लागतो आणि शेवटच्या क्षणी हसून म्हणतो, “जे करायचं, ते नीट कर. माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका.”
पत्नीकडून आरोपांचे खंडन
मृताची पत्नी निकिताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मानव शर्मा (Manav Sharma) मुंबईत (Mumbai) काम करत होता. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी निकितासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांतच, त्याची पत्नी त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊ लागली. (Agra Suicide Case)
Title : Agra Suicide Case TCS Recruitment Manager Commits Suicide Records Live Video






