America Attack on Iran | व्हेनेझुएलावर अमेरिकेने केलेल्या धक्कादायक कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. युद्धपटासारख्या या कारवाईत अमेरिकन हेलिकॉप्टर थेट व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये शिरले आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराचे जाहीरपणे कौतुक केले.
दक्षिण अमेरिकेतील देश अनेक दशकांपासून अमेरिकेविरोधात भूमिका घेत असताना, यावेळी अमेरिकेने थेट मोठे धाडस केल्याचे मानले जात आहे. क्युबाच्या अनुभवामुळे याआधी अमेरिका सावध होती, मात्र व्हेनेझुएलातील या कारवाईनंतर आता पुढचा निशाणा इराण असू शकतो, अशी चर्चा जागतिक पातळीवर सुरू झाली आहे.
इराणवर अमेरिकेची स्ट्राईक होणार का? :
व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर इराणमध्ये चिंता वाढली असून, सध्या देशभरात Gen Z च्या आंदोलनांनी जोर पकडला आहे. तब्बल ५० हून अधिक शहरांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनांमागे डोनाल्ड ट्रम्प यांचा हात असल्याचा थेट आरोप इराणकडून करण्यात आला आहे.
इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील देशांचे सार्वभौमत्व पायदळी तुडवले असून, संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः संयुक्त राष्ट्र संघाच्या कलम 2(4) ची आठवण करून देत, बळपूर्वक हल्ले जागतिक शांततेसाठी घातक असल्याचे इराणने म्हटले आहे.
America Attack on Iran | खोमेनींचा ट्रम्प यांना थेट इशारा :
अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. अमेरिका आमच्या सरकारवर खोटे आरोप करत असून, शत्रूच्या या कारवायांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी इराणी जनतेला केले. देवावर विश्वास आणि लोकांच्या पाठिंब्याच्या जोरावर शत्रूला गुडघ्यावर टेकवू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
यापूर्वी इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या संघर्षात अमेरिकेने मध्यस्थी करत इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते. त्या वेळी आखाती देशांतील अमेरिकन तळांचा वापर झाल्याने इराण अधिकच सावध झाला आहे. त्यामुळे अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (America Attack on Iran )
व्हेनेझुएलानंतर आता इराणवर संकट ओढवणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मध्य-पूर्वेत काहीतरी मोठे शिजत असल्याची चिन्हे दिसत असून, येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
News Title: After Venezuela, Will the US Attack Iran? Trump’s Dangerous Plan Sparks Global Tension
America attack on Iran, Trump Iran Venezuela, Ayatollah Khomeini warning, US Iran tension news
इराणवर हल्ला, डोनाल्ड ट्रम्प प्लॅन, खोमेनी इशारा, व्हेनेझुएला अमेरिका हल्ला






