Operation Sindoor | 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या (Pahalgam) भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर बिहारमधील हाजीपूर येथील (Hajipur) अनेक महिलांनी एक विशेष प्रतिज्ञा केली होती. (Operation Sindoor)
“जोपर्यंत हल्लेखोर दहशतवाद्यांचा सूड घेतला जात नाही, तोपर्यंत कपाळावर कुंकू लावणार नाही.” अशी ही प्रतिज्ञा होती. अखेर, आज 7 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानातील आणि पीओकेतील (Pakistan-Occupied Kashmir) दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत एअर स्ट्राईक (Air Strike) केला आणि महिलांचा तो संकल्प पूर्ण झाला.
महिलांचा ‘तो’ संकल्प पूर्ण-
या स्ट्राईकमध्ये एकूण 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यामध्ये 5 अड्डे पीओकेमधील तर 4 अड्डे पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर हाजीपूरच्या गांधी आश्रमातील महिलांनी एकमेकांना कुंकू लावून आनंद व्यक्त केला. या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे खास पत्र लिहून आभार मानले आहेत आणि लष्कराच्या पराक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची उलट प्रतिक्रिया
भारतीय वायुदलाने केलेल्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांच्यानुसार या हल्ल्यात 26 लोक ठार झाले असून 46 जखमी झाले आहेत. त्यांच्याकडून भारताने केलेल्या हल्ल्याचे ठिकाण दहशतवादी अड्डे नव्हते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा आरोप केला आहे. मात्र भारताकडून हे सर्व दावे फेटाळण्यात आले आहेत.
भारताकडून करण्यात आलेल्या स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. सुरक्षादलांच्या मते, या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक महत्त्वाचे टार्गेट्स नष्ट करण्यात आले आहेत.
Title : After Operation Sindoor Hajipur Women Apply Sindoor Again






