Rahul Solapurkar | अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) ‘अभ्यास करतो तो ब्राह्मण’ या वेदांमधील (Ved) वचनाप्रमाणे ब्राह्मण ठरतात, असे वक्तव्य एका डिजिटल माध्यमावर (Digital Media) बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य
राहुल सोलापूरकर यांनी एका डिजिटल माध्यमावर बोलताना, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘अभ्यास करतो तो ब्राह्मण’ या वेदांमधील वचनाप्रमाणे ब्राह्मण ठरतात,” असे वक्तव्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ (Video) शेअर करत निषेध केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी सोलापूरकर यांना देखील माफी मागण्याची मागणी केली आहे. “सोलापूरकर यांनी आता ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Siddharth Dhende) म्हणाले, “काहीही करून आपले ब्राह्मणत्व टिकवायला हवे, या जाणिवेतून काहीजण त्रस्त झालेत. सोलापूरकर यांच्यापेक्षा डॉ. आंबेडकर यांचा हिंदू धर्माचा अभ्यास नक्कीच जास्त होता. तोच हिंदू धर्म त्यांनी नाकारला व हे ब्राह्मण्यत्वाने ग्रस्त झालेले काहीजण त्यांना ब्राह्मण ठरवायला निघालेत. करावा तेवढा निषेध थोडाच आहे.”
पोलिसांकडून सोलापूरकरांच्या घरी बंदोबस्त
पोलिसांनी सोलापूरकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका प्रकरणाबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून ते अडचणीत आले होते. अशात त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. (Rahul Solapurkar)
Title : Actor Rahul Solapurkar Controversial Statementon Dr Ambedkar






