Aamir Khan | ‘दंगल’ या ऐतिहासिक यश मिळवलेल्या चित्रपटाबाबत अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक विनोदी पण लक्षवेधी खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी त्याचं करिअर संपवण्यासाठी त्याला म्हाताऱ्या वडिलांची भूमिका ऑफर दिली, असा विनोद त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासमोर केला होता.
‘दंगल’च्या भूमिकेला सुरुवातीला नकार, कारण होती ‘धूम 3’ची तयारी
आमिर खान ‘जस्ट टू फिल्मी’ या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत सांगतो की, ‘धूम 3’साठी त्याने खूप मेहनत घेतली होती. शरीरयष्टी तंदरुस्त आणि तरुण दिसण्यासाठी त्याचे बॉडी फॅट ९.६% पर्यंत कमी केले होते. अशा स्थितीत ‘दंगल’मध्ये एका ५५ वर्षीय वडिलांची भूमिका स्वीकारणं त्याला मनोमन कठीण वाटत होतं.
त्यामुळे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर त्याने सुरुवातीला ती भूमिका नाकारली. “मी नितेशला म्हटलं, ‘अरे, मी इतकं फिट झालोय आणि तू मला म्हाताऱ्या, जाड व्यक्तीची भूमिका करायला लावतोस!’ तेव्हा मी विनोद करत असंही म्हटलं की, शाहरुख-सलमानने तुला पाठवलंय का? याला एक म्हाताऱ्या बापाची भूमिका द्या आणि इंडस्ट्रीतून बाहेर टाका,” असं आमिर म्हणाला.
कथेचं वजन जाणवलं आणि घेतला अभिनयाचा मोठा निर्णय
पुढे आमिर म्हणतो, “ही भूमिका माझ्या खर्या वयाशी जुळणारी होती आणि मला वाटलं की प्रेक्षकांना आता माझं खरं वय समजेल. ‘धूम 3’ मधील तरुण आमिरची प्रतिमा यामुळं मोडेल, याची भीती होती. पण नितेश तिवारी यांनी तयार केलेली कथा इतकी प्रभावी होती की, मी शेवटी हा चित्रपट स्वीकारला.”
“सुरुवातीला मी म्हणालो की ही कथा १०-१५ वर्षांनी कर, पण नंतर मी स्वतःहूनच म्हटलं – चला करूया! पुढे जे होईल ते पाहू,” असंही आमिरने सांगितलं.
‘दंगल’नं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि आजही तो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक गल्ला कमावणारा चित्रपट म्हणून ओळखला जातो.
Title: Aamir Jokes: SRK-Salman Tried to End My Career
Keywords:
Aamir Khan Dangal, Salman Khan, Shah Rukh Khan, Dangal Role Rejection, Aamir Khan Interview, आमिर खान दंगल, सलमान खान, शाहरुख खान, दंगल भूमिका, आमिर खान मुलाखत






