Navi Mumbai Crime | काही दिवसांपूर्वीच आळंदीमध्ये खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या 15 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता नवी मुंबईतून (Navi Mumbai )एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नवी मुंबई परिसरातील तुर्भ्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 10 वर्षांच्या एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालंय. नवी मुंबईमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 30 वर्षी आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, लाल माती आणण्याच्या बहाण्याने आरोपीने मुलाला बाहेर घेऊन गेला. तो त्याला फायजर कंपनी रोडवरील एका भिंती मागे घेऊन गेला. तिथे त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. 10वर्षांचा मुला प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याच वेळी आरोपीने मुलाला निर्वस्त्र केले.
आरोपीने मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. घाबरलेल्या अवस्थेत मुलाने घर गाठले आणि घडलेला प्रसंग पालकांना सांगितला. पालकांनी ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांची तत्काळ कारवाई
या किळसवाण्या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या मनात आता भितीच वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी पोलीस परिसरातले सीसीटीव्ही तपासत आहेत. तर नागरिकांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.
Title: Sexual assault on 10-year-old boy in Navi Mumbai






