A R Rahman | प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांना नुकतीच आरोग्याची तक्रार जाणवल्यामुळे चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या पत्नी सायरा रहमान (Saira Rahman) यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, “माझे आणि रहमान यांचा अधिकृत घटस्फोट झालेला नाही, त्यामुळे मला त्यांची माजी पत्नी म्हणू नका,” असे स्पष्ट आवाहन केले आहे.
सायरा रहमान यांची स्पष्ट भूमिका
ए.आर. रहमान (A R Rahman) यांना रविवारी सकाळी डिहायड्रेशनची समस्या जाणवल्याने अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospitals, Chennai) मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, काही तासांच्या उपचारांनंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असताना, सायरा रहमान यांनी माध्यमांना दिलेल्या ऑडिओ संदेशात म्हटले, “गेल्या दोन वर्षांपासून माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण द्यायला नको म्हणून आम्ही विभक्त झालो आहोत. मात्र, आम्ही अधिकृतपणे घटस्फोट घेतलेला नाही, त्यामुळे कृपया मला ‘माजी पत्नी’ म्हणू नका.”
रहमान यांच्या प्रकृतीत सुधारणा
५८ वर्षीय ए.आर. रहमान (A R Rahman) यांना रविवारी सकाळी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे व्यवस्थापक सेंथिल वेलन (Senthil Velan) यांनी सांगितले की, “रहमान यांना सकाळी डिहायड्रेशनची समस्या झाली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.”
रहमान यांचा मुलगा ए.आर. अमीन (A.R. Ameen) याने अपोलो हॉस्पिटलच्या वैद्यकीय बुलेटिनचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. बुलेटिननुसार, “सकाळी डिहायड्रेशनच्या लक्षणांसह रहमान रुग्णालयात आले होते, परंतु सर्व चाचण्या केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.”
सायरा रहमान यांनी देखील या कठीण काळात रहमान यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. “मी देखील नुकतीच शस्त्रक्रिया करून सावरत आहे, त्यामुळे मला माहिती आहे की अशा परिस्थितीत मानसिक आणि शारीरिक पाठिंबा किती महत्त्वाचा असतो. मी नेहमीच रहमान यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत राहीन,” असे त्या म्हणाल्या.






